मेजवानी

अन्न हे पूर्णब्रह्म

राजमा मसाला

 
साहित्य-
१)राजमा-१/२ कप
२)टोमाटो-३ मध्यम आकाराचे
३)१ मोठा कांदा-बारीक चिरून 
४)आल-लसून-हिरवी मिरची पेस्ट-१ टेबल स्पून 
५)धणेपूड-१ टी स्पून 
६)जिरे पूड-१/२ टी स्पून 
७) लाल तिखट-१ टी स्पून
८)गरम मसाला-१/२ टी स्पून
९)कसुरी मेथी-१/२ टी स्पून
१०)चवीनुसार मीठ
११)गरजेनुसार तेल
१२)कोथांबीर
१३)तळलेले पनीरचे तुकडे (ऐच्छिक )
पूर्वतयारी-
१)राजमा साधारण ६ ते ७ पाण्यात भिजत घालावा व त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये साधारण ४ ते ५ शिट्ट्या करून मऊसर शिजवून घ्यावा .राजमा शिजवल्यानंतर यातले पाणी फेकू नये हेच पाणी ग्रेव्हीसाठी वापरावे .
२)टोमाटोची प्युरी बनवून घ्यावी
कृती-
१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तपकिरी रंगावर भाजून घ्यावा त्यानंतर त्यात आल-लसून-हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्यावी
२)आता यात टोमाटो प्युरी घालून व २ ते ३ मिनिट तसेच शिजू द्यावे त्यानंतर यात धणेपूड,जिरेपूड,लाल तिखट व गरम मसाला घालून परतून घ्यावे
३)आता यात शिजवलेला राजमा घालावा व परतून घ्यावे आता यातच  गरजेपुरते राजमा शिजवलेले पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यावे
४)मंद आचेवर राजमा साधरण १५ ते २० मिनिट शिजू द्यावा त्यादरम्यान त्यात कसुरी मेथी घालावी व आवडत असल्यास थोडे बटर घातले तरी छान चव येते
५)आच बंद केल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथांबीर घालावी व गरमागरम राजमा मसाला पोळी,नान किंवा भाताबरोबर सर्व्ह करावा
                                                                        किंवा
राजमा सर्व्ह करण्याआधी सर्व्हिंग प्लेटमध्ये तळलेले पनीरचे तुकडे टाकावेत मग वरून राजमा मसाला घालावा छान चव येते .
 

Mon, November 14 2011 » शाकाहारी » No Comments

मिरची वडा

साहित्य-
१)लांब जाड हिरव्या मिरच्या -५ ते ६
सारणासाठी- 
२)उकडलेले बटाटे -३(मध्यम आकाराचे )
३)आल-लसून-हिरवी मिरची पेस्ट-दीड टी स्पून
४)लाल तिखट-१/२ टी स्पून
५)हळद-चिमुटभर
६)चाट मसाला-१/४ टी स्पून
७)लिंबाचा  रस-१/२ टी स्पून (ऐच्छिक )
८)धने-बडीशेप-१ टी स्पून  प्रत्येकी
९)शेंगदाण्याची जाडसर भरड-१ टेबल स्पून
१०)चवीनुसार मीठ
११)गरजेनुसार तेल
१२)बारीक चिरलेली कोथांबीर
बेटरसाठी 
१३)बेसन-१ कप
१४)लाल तिखट -१ टी स्पून
१५)चवीनुसार मीठ  
तळण्यासाठी तेल
कृती-
१)प्रथम बेसन ,लाल तिखट व मीठ एकत्र करून थोडे पीठ भिजवून घ्यावे .साधारण भज्यांसाठी भिजतो तसे किंवा त्यापेक्षा किंचित घट्टसर .
२)मिरच्या धुवून पुसून घ्याव्यात व प्रत्येक मिरचीला मधोमध चीर देऊन त्यातील बिया काढून टाकाव्यात .
३)धने व बडीशेप तव्यावर हलकेच भाजून घ्यावेत व त्यांना  खलबत्त्यात भरडसर कुटून घ्यावे .आता एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात आल-लसून-हिरवी मिरची पेस्ट घालावी त्यानंतर धने-बडीशेपाची भरड  तसेच शेंगदाण्याची भरड घालावी त्यानंतर  हळद ,लाल तिखट घालून उकडलेले बटाटे घालून एकजीव करून घ्यावे व त्यात चवीनुसार मीठ व कोथांबीर घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे व आच बंद करावी .आता यात चाट मसाला व लिंबाचा रस घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे
४)तळण्यासाठी तेल तापत ठेवावे ,वरील तयार मिश्रण मिरच्यांमध्ये भरावे व ह्या मिरच्या पिठात(कृती १) बुडवून गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्याव्यात ,
५)गरमागरम मिरच्या टोमाटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह कराव्यात
                                  किंवा
तळलेल्या मिरच्या कापून प्रत्येक मिरचीचे  २ ते ३ भाग करावेत व पुन्हा तळून घ्याव्यात व सर्व्ह कराव्यात
Tip :

उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावेत

Sat, November 5 2011 » Snacks » No Comments

नारळी भात

 
साहित्य-
१)तांदूळ-३/४ कप
२)खवलेला ओला नारळ-१ कप
३)किसलेला गुळ-३/४ कप
४)काळी मिरी-५ ते ६ दाने
५)लवंग-४ ते ५ काड्या
६)केशर-७ ते ८ काड्या
७)तूप-गरजेनुसार 
८)खजूर-बारीक चिरून-१ ते २ टेबल स्पून 
९)सुका मेवा -आवडीनुसार 
१०)वेलची पूड-२ ते ३ चिमटी
कृती-
१)तांदूळ धुवून निथळत ठेवावे ,एका भांड्यात १ टी स्पून तूप गरम करत ठेवावे ,तूप गरळ झाले कि त्यात काळी मिरी व लवंग भाजून घ्यावेत  ,आता यात निथळत ठेवलेला तांदूळ घालून ३ ते ४ मिनिट परतून घ्यावे व केशर घालावे
२)त्यात साधारण दीड कप गरम पाणी घालून पूर्ण भात शिजवून घ्यावा ,भात शिजला कि एका ताटात भात मोकळा करून ठेवावा
३)भात थंड झाला कि त्यात हलक्या हाताने नारळ व गुळ एकत्र करावे
४)एका पातेल्यात तूप गरम करून त्यात काजू,बेदाणे किंवा जो सुका मेवा वापरत असाल तो तळून घ्यावा व बाजूला काढून घ्यावा .आता याच पातेल्यात नारळ व गुळ मिश्रित भात घालावा तसेच थोडी वेलची पूड  व बाईक चीअलेला खजूर घालावा
५)मंद आचेवर भात साधारण १५ मिनिट शिजवून घ्यावा अधून मधून हलक्या हाताने भात ढवळत राहावा कारण भात खाली चिकटायची शक्यता असते
६)आच बंद केल्यानंतर तळलेला सुका मेवा घालावा व गरमागरम भात थोडे साजूक तूप घालून सर्व्ह करावा .
टीप-
 नारळ व गुळ मिश्रित भात बनवण्यासाठी जाड बुडाचे पातेले वापरावे पण जाड बुडाचे पातेले नसेल तर एक तवा गरम करत ठेवावा व तव्यावर पातेले ठेवावे narli bhat
 

Mon, October 31 2011 » गोड » No Comments

पुरणपोळी

पुरणपोळी
साहित्य
पूरणासाठी-
१)चणाडाळ -१ कप
२)साखर-१ ते सव्वा कप
३)वेलची पूड-१/४ टी स्पून
४)जायफळ पूड-चिमुटभर
पारीसाठी-
१)मैदा किंवा गव्हाचे पीठ-२ कप
२)चिमुटभर -मीठ,साखर आणि हळद
कृती-
१)प्रथम कणकेत  मीठ,साखर व हळद घालून मळून घ्यावी व त्यावर ओला सुती कापड ठेवून दीड ते २ तास मुरु द्यावे
२) चणाडाळ कुकरमध्ये बोटचेपी शिजवून घ्यावी (साधारण  मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या झाल्यावर आच बंद करावी )त्यानंतर डाळीतील पाणी गळून घ्यावी हे पाणी कटाच्या आमटीसाठी वापरावे
२)थोडा वेळ डाळ निथळत ठेवावी त्यानंतर डाळीत साखर मिसळून घ्यावी व मिक्सरमधून  बारीक पेस्ट करून घ्यावी , ही पेस्ट थोडी पातळसर होते म्हणून कढईत मंद आचेवर परतून घ्यावे म्हणजे त्यातील जास्तीचा ओलसरपणा निघून जाईल साधारण ८ ते ९ मिनिट  मंद आचेवर परल्यानंतर यात जायफळ पूड व वेलची पूड घालावी पुरणपोळीसाठी पुरण तयार असेल
३) दीड  ते २ तासांनी कणिक चांगली तिंबून घ्यावी ,आता कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घ्यावी त्यात पुरणाचा गोळा ठेवून पारीचे तोंड बंद करून थोडा मैदा भुरभुरून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यावी व मंद आचेवर साजूक तूप टाकून पोळी भाजून घ्यावी
४)अश्याचप्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्यात व गरमागरम पुरणपोळी कटाची आमटी,भात ,खीर सोबत सर्व्ह करावे जोडीला थोडी भजी,पापड व लिंबाची फोड ठेवावी .
टीप-
१)कणिक वापरताना ती आधी कणिक चाळणीने चालून घ्यावी
२)पुराणात साखरेएवजी गूळही घालू शकतो तसेच डाळ  व साखर एकत्र  करून आधी शिजवून मग नंतर पुरणयंत्रातून वाटून घेऊन शकतात

Wed, October 26 2011 » गोड, पोळी,भाकरी ,पराठे » No Comments

कटाची आमटी

 

साहित्य-
१)कटाचे पाणी
२)१ मोठा कांदा -उभा चिरून
३)किसलेले सुके  खोबरे-१/४ कप
४)लसून -५ मध्यम पाकळ्या
५)आल-दीड  इंच
६)धणेपूड-१ टी स्पून
७)लाल तिखट-२ टी स्पून
८)गरम मसाला-१/२ टी स्पून
९)जिरे-१/२ टी स्पून
१०)कढीपत्ता-
११)तमालपत्र-१
१२)चवीनुसार मीठ
१३)गरजेनुसार तेल
पुरणपोळीसाठी डाळ शिजवल्यानंतर डाळमधले पाणी गाळून घ्यावे हे पाणी म्हणजेच कटाचे पाणी
कृती -
१)प्रथम उभा चिरलेला कांदा ताव्यावत थोडे तेल टाकून तपकिरी रंगावर भाजून घ्यावा तसेच खोबरेही हलक्या तपकिरी रंगावर भाजून घ्यावे जास्त जाळू नये
२)आता एका मिक्सरच्या भांड्यात  भाजलेला कांदा,खोबरे,लाल तिखट,धणेपूड,गरम मसाला ,जिरे,आल-लसून घालावे थोडे पाणी घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी कटाचा मसाला तयार असेल
३)एका कढईत तेल गरम करत ठेवावे,तेल गरम झाले कि त्यात तमालपत्र व कढीपत्ता घालावे त्यानंतर कटाचा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा साधारण ८ ते १० मिनिटे परतून घ्यावा
४)आता यात कटाचे पाणी घालावे व मसाल्यात एकजीव करून घ्यावे गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालावे

५)मध्यम आचेवर साधारण १० ते १२ मिनिट आमटी उकळू द्यावी त्यानंतर आच बंद करून बारीक चिरलेली कोथांबीर घालून गरमागरम कटाची आमटी पुरणपोळी खीर व भाताबरोबर सर्व्ह करावी.

Wed, October 26 2011 » कढी/आमटी » No Comments

पापडी

 
 
साहित्य-
१)बेसन -अंदाजे ८ ते ९ टेबल स्पून
२)तेल -१/४ कप
३)पाणी-१/४ कप
४)हळद-चिमुटभर
५)चवीनुसार मीठ
६)तळण्यासाठी तेल
कृती-
१)प्रथम तेल व पाणी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमधून १० सेकंदासाठी फिरवून घ्यावे ,आता हे मिश्रण पांढरे झालेले असेल
२)आता एका बाउलमध्ये वरील तेल-पाण्याचे मिश्रण घ्यावे व त्यात हळद व चवीनुसार मीठ घालून या मिश्रणात मावेल एवढे बेसन घालावे साधारण ८ ते ९ टेबल स्पून लागते ,नेहमीच्या पोळ्यांसाठी कणिक मळतो त्यापेक्षा जरा मऊ पीठ मळून घ्यावे
३)आता सोर्यात पापाडीसाठीची ताटली बसवून घ्यावी व सोऱ्याला तेलाचा हात लावून घ्यावा व वरील पीठ त्यात भरून गरम तेलात पापडी  पाडावी व हलक्या रंगावर मध्यम आचेवर तळून घ्यावी .
 

 

Tue, October 25 2011 » Snacks, दिवाळी फराळ » 2 Comments

केसर -बेसन लाडू

 
साहित्य-
१)बेसन-दीड कप
२)पिठी साखर -१/२ ते ३/४ कप
३)तूप-१/४ कप न वितळलेले
४)केसर-१२ ते १३ काड्या
५)दूध -१/४ कप
६)वेलची पूड -१/४  टी स्पून
कृती-
१)प्रथम दूध थोडे गरम करून घ्यावे व त्यात केसरच्या काड्या चुरून टाकाव्या व एका बाजूला ठेवून द्यावे.
२)एका कढईत तूप गरम करावे व त्यात बेसन खमंग भाजून घ्यावे साधारण लालसर रंग येईपर्यंत भाजावे साधारण २० ते २५ मिनिटे
भाजावे ,सारख ढवळत राहावे म्हणजे ते खाली लागणार नाही
३)बेसन नीट भाजले गेले कि  आच बंद करावी व  त्यात केसर मिश्रित दूध घालावे ,आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे
४)मिश्रण थंड झाले कि त्यात वेलची पूड व पिठी साखर घालावी व नीट एकजीव करून घ्यावे व मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यावे
 
 

 

Sun, October 23 2011 » गोड, दिवाळी फराळ » No Comments

पोह्यांचा चिवडा

 
साहित्य-
१)पोहे -२०० ग्रॅम
२)तिखट शेव-२ कप
३)खोबर्याचे काप
४)शेंगदाणे
५)हळद-१/४ टी स्पून
६)आमचूर-१/२ टी स्पून
७)पिठीसाखर-१ टी स्पून
८)लाल तिखट-१ टी स्पून
९)चवीनुसार मीठ
१०)तळण्यासाठी तेल
कृती-
१)प्रथम गरम तेलात मध्यम आचेवर पोहे तळून घ्यावे व पेपर टोवेलवर पसरावे म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल
२)वरील तळलेले पोहे एका मोठ्या बाउलमध्ये घ्यावे व त्यावर हळद,लाल तिखट ,आमचूर,पिठी साखर व चवीनुसार मीठ घालावे
३)आता यात तळलेले शेंगदाणे व खोबर्याचे काप घालावेत व सर्व मिश्रण हलक्या हाताने एकजीव करावे तसेच यात तिखट शेवही घालून एकत्र करावी
टीप-
1)यात लाल तिखटाएवजी उभ्या  चिरलेल्या हिरव्या मिरच्या तळून घालू शकतात
२)पोहे तळताना पोहे एका गाळणीत टाकून गाळणी तेलात धरावी म्हणजे पोहे तेलातून काढताना सोपे पडेल आणि तेल जास्त खराबही होणार नाही .
३)पोहे तळलेले असल्याने हळद,लाल तिखट वैगरे पोह्याला व्यवस्थित लागते.
 

 

Sun, October 23 2011 » Snacks, दिवाळी फराळ » No Comments

तिखट शेव

 
साहित्य-
१)बेसन -७ ते ८ टेबल स्पून
२)पाणी-१/४ कप
३)तेल-१/४ कप
४)हळद-१/४ टी स्पून
५)लाल तिखट-१ टी स्पून
६)ओवापूड  -१/८ टी स्पून
७)चवीनुसार मीठ
८)तळण्यासाठी तेल
कृती-
१)प्रथम तेल आणि पाणी एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन १० ते २० सेकंद मिक्सरमधून फिरवून घ्यावे म्हणजे ते एकजीव होतील
२)आता या तेल-पाणी मिश्रणात मीठ ,ओवापूड,हळद व लाल तिखट घालून एकजीव करून घ्यावे यानंतर यात थोडे थोडे करून बेसन घालावे व एकजीव करत जावे साधारण आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो  त्यापेक्षा मऊ असावी .
३)आता सोर्यात बारीक शेवेची ताटली बसवून सोऱ्याला आतून तेल लावून घ्यावे व तयार पीठ त्यामध्ये भरून घ्यावे व गरम तेलात गोलाकार आकारात
सोर्या फिरवून शेव पाडावी व  तळून घ्यावी
 

 

Sat, October 22 2011 » Snacks, दिवाळी फराळ » No Comments

शंकरपाळे

 
साहित्य-
१)मैदा-सव्वा कप
२)रवा-१/४ कप
३)पिठी साखर-१ कप
४)खायचा सोडा-चिमुटभर
५)तळण्यासाठी तूप
कृती-
१)मैदा,रवा व पिठी साखर एकत्र करून घ्यावे

व त्यात २ टेबल स्पून गरम तूपाचे मोहन घालावे तसेच

त्यात खायचा सोडा मिसळून दूध घालून पीठ मळून घ्यावे

हे पीठ साधारण ३० मिनिटासाठी झाकून ठेवावे
२)३० मिनिटानंतर तयार पीठ पुन्हा मळून घ्यावे व ह्या पीठाचे दोन समान भाग करून घ्यावे व एक पिठाचा गोळा घेऊन नेहमीच्या पोळीपेक्षा
जाडसर लाटून कातणाने  किंवा सुरीने शंकरपाळे कातून घ्यावे ,ह्याचप्रकारे दुसर्या पीठाचेहि शंकरपाळे करून घ्यावेत
३)तयार शंकरपाळे  गरम तुपात मध्यम आचेवर  सोनेरी रंगावर तळून घ्यावे .
 

 

Sat, October 22 2011 » गोड, दिवाळी फराळ » No Comments